माया नगरी दुबई

मुंबई जशी हिंदुस्तानाची माया नगरी तसेच दुबई युअेई तील सात तारकां पैकी एक. दिवाळी च्या सुट्टीत दुबई सहली चा योग जुळून आला. 

काल चा दुबई दर्शनाचा पहिला दिवस.  आम्ही सगळे फार उत्सुक होतो. एक कॅब आम्हास हाॅटेल वर घेण्यास आली. सुमारे १ तास फिरल्यावर आम्ही पिकअप पाॅईंट वर पोहचलो. नागपूर च्या मे महिन्यातील उकाड्या ला मात द्यावा असले भयानक ऊन. एसी बस ची वाट बघत समोर दिसणार्या बुर्ज अल अरब चा समोर सेल्फी काढण्याचा मोह आम्ही आवरत होतो. 

वेळातच बस आली व वेग वेगळ्या दर्शनीय स्थानांवर थांबत आमचे गाव भ्रमण सुरु होते. गाईड ने कोण कुढले विचारुन एकंदर सगळ्यांची माहिती काठली. थोड्यावेळाने चक्क इंग्रजीत व जर्मन मध्ये वर्णन सुरु केले. १० वर्षे जर्मनीत राहणार्यास लाज वाटावी इतकी अस्खलीत जर्मन तो बोलत होता.

साधारण ३-४ तास फिरल्यावर आमचा टुअर संम्पला. माहिती सकट फिरल्याच्या आनंदातच हाॅटेल जाण्या करीता शटलं बस मध्ये शिरलो. तेवढ्यात आमचं लेकरु ओरडलं मम्मा (शेवटी जर्मन … आई म्हणायची प्रक्टीस सुरु आहे) ईंडीयन डिनर. ऊशीर झालेला म्हणून आमच्या पंच तारांकित हाॅटेलातील महागडे जेवण घेण्याचा बेत होता.

तेवढ्यात समोरुन आवाज आला “साब किधर जानेका है मैं छोड देगा”. लगेच मी बायकोच्या कानात पुटपुटलो “किती वेळी सांगितले आहे ह्या कार्टीला हळू बोलावे.” पण लगेच बायकोचे उत्तर “अहो बघा तर काय म्हणतोय ते.”

मी त्याला विचारले “हाॅटेल के पास ईंडीयन देखो”. मग नेहमी प्रमाणे बोलण्याचा ओघ सुरु झाला. १९७७ मधील आणीबाणीत त्याने भारतं सोडला. तब्बल ३० वर्षे मस्कट मध्ये काढली नंतर दुबई त.

“आपने तकलीफ की – मी , एक ईंडीयन ही  ईंडीयन के काम आएगा – तो” वगैरे झालं. जवळच एक पाकिस्तानी रेस्टाॅरंट पाशी थांबलो. “ये सस्ता और बढीया है आपको पसंद आएगा. मै बंम्बई मे रहा हूं, तुमची टेस्ट माहिती मला.” चक्क मराठीत, मी उडालोच! 

रेस्टाॅरंट ठीकच, पार्सल घेऊन आम्ही निघालोच. मी चुकुन नको तो प्रश्ण टाकला. “तुमची फैमिली?” 

“एक ड्रायव्हर को दुबई क्या रास आएगा. फैमिली के साथ रहेगा तो कमायेगा क्या? महिनो मे मुलाकात होती. उसी हम खुश होते. बच्चे लोग बडे बनेंगे तभी सुकुन आएगा”

त्या नंतर मी काही बोलु शकलो नाही. हाॅटेला पोहचलो टीप दिली तो खुश झाला. मी विचारताच होतो.

“एक ५५ वर्षीय व्यक्ती गेले ३०-३५ वर्षे बायका मुलांसाठी, दुर राहुन, अजुन झटतोय” हा विचार करतांना, त्यांच दुबई तील पंच तारांकित हाॅटेलातील एसी रुम मध्ये टिव्ही बघत, पनीरचा घास घेतांना माझ्या मुली कडे बघितले, व मन भरुन आले! 

आज खर्या अर्थाने २ दुबईंचे दर्शन झाले. दिव्य अश्या रोशणाईत कित्येक दिवे लुकलुकण्याचा प्रयास करतायेत हे अनुभवले!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s